

इचलकरंजी (कोल्हापूर) : रंगपंचमीला कोरोनाचे निर्बंध मोडणाऱ्यांना खाकीने चांगलाच रंग दाखवला. निर्भया पथक व पोलिस पथकाने शहरात ठिकठिकाणी हुल्लडबाजी करत रंगपंचमीचा आनंद लुटणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई केली. दोनशेहून अधिक वाहनांवर कारवाई करून सुमारे 60 हजार रुपयांचा दंड ठोठावला. शहरात शुक्रवारी रंगपंचमीला रंग खेळणाऱ्यांवर कारवाई करताना पोलिस दिसून आले. त्यामुळे रंगाचा धुरळा उडत असताना कारवाईचा धडाका उडाला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने विविध सण, उत्सवांवर कडक निर्बंध आणले आहेत. होळीचा सण या नियमावलीत पार पडला. मात्र रंगपंचमीचा दांडगा उत्साह कोरोना प्रसारासाठी पोषक ठरणारा होता. त्यामुळे पोलिस प्रशासनाने कंबर कसली. पहाटेपासून शाळा, महाविद्यालय परिसर, चौक, गर्दीच्या ठिकाणी पोलिस तैनात होते. भरारी पथक व निर्भया पथकाचा फिरता वॉच होता.गल्लीबोळ, मुख्य मार्गावर करडी नजर पोलिसांनी ठेवली.
गतवर्षी कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये रंगपंचमी मुकली. त्यामुळे यंदा कोरोनाचे निर्बंध असले तरी रंगपंचमीचा उत्साह घरात बसून अनेकांना आवरता आला नाही. मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरून रंगपंचमी साजरी झाली. मात्र पोलिसांनी थेट दंडात्मक कारवाईचे शस्त्र उपसले. महाविद्यालयांना शुक्रवारी सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांनी कॉलेज परिसरात रंगपंचमीसाठी हजेरी लावली. मात्र पोलिसांनी विद्यार्थ्यांना गर्दी करण्यापासून रोखले.हुल्लडबाज तरुणांवर कारवाईचा फास आवळला.
गल्लीबोळ, मुख्य मार्गावरून टोळक्याने व कर्णकर्कश हॉर्न वाजवत फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. रंगपंचमी खेळुन पंचगंगा नदीवर आंघोळीसाठी येणाऱ्यांवर निर्भया पथकाने कारवाईचा बडगा उगारला.सुमारे 35 जणांवर निर्भया पथकाने कारवाई केली.
रेकॉर्डवरील गुन्हेगार ताब्यात
रंगपंचमीला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष काळजी घेतली. या पार्श्वभूमीवर शहरातील तीन पोलिस ठाण्याच्या क्षेत्रातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. एकूण 58 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना दिवसभर संबंधित पोलिस ठाण्यात ठेवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.